डॉक्टरकडे जातो असे सांगून गेलेला तरुण झाला बेपत्ता
पनवेल दि.०९(संजय कदम): डॉक्टरकडे जातो असे सांगून गेलेला तरुण अद्याप घरी न परतल्याने तो तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
       कमाल नुर हसन(वय १९ रा.संगम सोसायटी, सेक्टर १३, कळंबोली) सदर तरुणाचा बांधा मजबूत, उंची ५ फूट, केस काळे, दाढी नाही, मिशी बारीक आलेली, रंग सावळा, नाक आखूड व जाड, चेहरा गोल असून अंगात लाल रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे. सोबत मोबाईल फोन आहे. या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४२३००० किंवा पोहवा के.एन म्हात्रे यांच्याशी संपर्क साधावा
थोडे नवीन जरा जुने