परिणिता सोशल फाऊंडेशन आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल मध्ये प्रथमच महिला उद्योजिकांचे गृहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन



पनवेल दि.०८(संजय कदम):  परिणिता सोशल फाऊंडेशन आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल मध्ये प्रथमच महिला उद्योजिकांचे गृहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन दिनांक १० आणि ११ फेब्रुवारी राजी पनवेल शहरातील गोखले हॉल मध्ये सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.



           या प्रदर्शनाला उदघाटक म्हणून पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, नवी मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, परिणीता सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका साक्षी सागवेकर व परिणीता सोशल फाउंडेशनच्या महाराष्ट्र्र  कोअर टीम लीडर नंदिनी पंडित हे उपस्थित राहणार असून यांच्याहस्ते दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे.




 या प्रदर्शनात विविध प्रकारच्या साड्या, ज्वेलरी, लखनवी कुर्ता, वेस्टर्न वेअर, ट्रॅडिशनल किड्स वेअर, पूजा साहित्य, आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स, टपर वेअर, रेडीमिक्स प्रॉडक्ट्स, कोकण प्रॉडक्ट्स, श्रीखंडच्या विविध व्हरायटीज, कॉपर हाऊस यांसह इतर अनेक गृहपयोगी वस्तू खरेदी व विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. तरी महिला भिगीनींनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन परिणीता सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका साक्षी सागवेकर यांनी केले आहे.  



थोडे नवीन जरा जुने