डोळवली येथील भव्य भजन स्पर्धेचा विजेता ठरला - आसरोटी भजनी मंडळ






काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १४ फेब्रुवारी, ग्रामीण भागातील भजनी कलाकरांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने डोळवली येथे सागर गवस्कर व वैभव रसाळ या दोन तरुणांनी एक दिवशीय भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत १६ भजनी मंडळांनी आपली कला सादर केली भारतीय संस्कृतीत संगीताला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले असून सर्वाचा कल आपोआप संगीत क्षेत्राकडे वाढत असतो. संगीताच्या जोरावर कोणालाही आपलंस करता येते, त्यामुळे संगीताची गोडी सर्वाना निर्माण व्हावी या उद्दात विचारांतून संगित भजनांचे आयोजन करण्यात आले होते.



             यावेळी ओंकार प्रासादिक भजनी मंडळ आसरोटी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक खरसुंडी येथील ओमसाई भजनी मंडळाने व तृतीय क्रमांक ताजुबाई बाल भजनी मंडळाने पटकावल्याने या सर्व विजयी भजनी मंडळांना रोख रक्कम आणि आकर्षक ट्राफी देऊन गौरविण्यात आले असून उकृष्ट तबला वादक म्हणून यश देशमुख - वारद, उकृष्ट पखवाज वादक विकास सावंत - वडवळ, उकृष्ट गायक म्हणून आर्या पाठारे - गोंदाव हीस रोख रक्कम व ट्राफी देत सन्मानित करण्यात आले.


         यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, मनसेचे जिल्हा सचिव जे.पी.पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, सल्लागार नवीन घाटवल, प्रशांत खांडेकर, प्रणाल लाले, अतुल देशमुख, शिवाजी पाटील, अँड.निलम चोरगे, सोपान कालेकर, शांताराम गवस्कर, मारुती रसाळ, उत्तम देशमुख, गौरव दिसले, विष्णू ठोंबरे, प्रफुल्ल ठोंबरे, तानाजी पाटील, प्रमोद दळवी, राजू खांडेकर, निवृत्ती कालेकर, विकी म्हसे, बाळू पवार आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने भजनी प्रेमी व भजनी कलाकार उपस्थित होते. तर संपूर्ण स्पर्धेचे सुत्रसंचालन दिपक दिसले व परिवेक्षक म्हणून काम श्रीधर भोसले - डोंबिवली यांनी पाहिले.






थोडे नवीन जरा जुने