महाराष्ट्र राज्य कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांच्या हस्ते सुभाष मुंढे यांचा सन्मान


काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १४ फेब्रुवारी, शेतकरी वर्गांस शेती विषयी माहिती उपलब्ध व्हावी या उद्दात विचारांतून दर वर्षी प्रमाणे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा ( आत्मा ) रायगड यांच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनांचे आयोजन सेक्टर २७ सिडको मैदान खांदेश्वरी रेल्वे स्टेशन जवळ कामोठे पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते.सदर या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील प्रथम मान्यता मिळालेली सुखकर्ता ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी कोपरी ( खालापूर) चे चेअरमन सुभाष महादू मुंढे यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

                 

या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी वर्गांस विविध माहिती प्रधान करण्यात आली.विशेष म्हणजे हा कार्यक्रम सलग पाच दिवस असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सह जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी हजेरी लावून या ठिकाणी संपूर्ण माहिती शेतकरी बांधव यांच्या देण्यात आली.यावेळी रोज हजारोंच्या संख्या या ठिकाणी शेतकरी वर्ग उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी,समवेत कृषी ची टिम उपस्थित होती.


             यावेळी या कार्यक्रमात दीडशेहून अधिक दालने ठेवण्यात आली होती.त्याच बरोबर शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद, व शेतकरी सन्मान, फळ व धान्य महोत्सव, उत्पादन ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था, पौष्टिक तृणधान्य न्युट्रिक मिलेट्स, अन्नपदार्थ
 विक्री व प्रदर्शन,कृषी यांत्रिकीकरण फ्रॉम द्वारे फवारणी, आणि प्रात्यक्षिके एफ पी ओ व महिला बचत गट उत्पादने स्वतंत्र दालने,कृषी प्रक्रिया व कृषी पूरक व्यवसाय विक्रेता व खरेदीदार संमेलन अश्या विविध माध्यमातून हा कृषी मोहत्सव सुरु करण्यात आले होते.

थोडे नवीन जरा जुने