शिवजन्मोत्सव निमित्त परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे प्रा.नितीन बानुगडे पाटील यांच्या व्यख्यानाचे आयोजन

पनवेल दि.१४(संजय कदम): छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्वत्र साजरी होणार आहे. त्यानिमित्त परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे शिव जन्मोस्तव साजरा करण्यात येणार आहे.


             शिवजन्मोत्सव निमित्त परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे येत्या १९ फेब्रुवारी २०२३ रोजी खांदा कॉलोनी, भूखंड क्र.२८अ, से.९ येथे प्रा.नितीन बानुगडे पाटील यांच्या व्यख्यानाचे आयोजन सायंकाळी ७ ते १० वाजे पर्यत आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागिकांनी भेट द्यावी असे आवाहन परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी केले आहे.थोडे नवीन जरा जुने