रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या डांबरीकरणाचे काम झाले सुरु

पनवेल दि.१४(संजय कदम): पनवेल जवळील करंजाडे वडघर रस्त्यावर गेल्या काही दिवसापासून खड्डे पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या संदर्भात करंजाडे पोलीस पाटील कृणाल लोंढे यांनी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सदर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.           करंजाडे वडघर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. पनवेल उरण रस्ता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्याकडे वर्ग केला असल्याने त्या अधिकाऱ्यांकडे पोलीस पाटील कृणाल लोंढे सातत्यपूर्ण पाठपुरवठा करून करंजाडे - वडघर पुला पासून कॉलेज फाटा वडघर पर्यंतच्या रस्त्याच्यवर पडलेल्या खड्ड्यांचे डांबरीकरणाचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून रस्त्यांवरील पडलेले खड्ड्यांच्या दंबरीकरणाला सुरुवात झाली आहे.थोडे नवीन जरा जुने