सण उत्सव शांततेने नियमांचे पालन करून करा खालापूर पोलीस निरीक्षक बी आर कुंभार







काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १५ फेब्रुवारी, कायदा सुव्यवस्था राखणे हे प्रत्येक नागरिकांचे काम आहे.आपल्या चुकीमुळे कोणतेही प्रकार घडू नये यासाठी प्रत्येकांनी सतर्क राहिले पाहिजे.येणाऱ्या काही दिवसांत छत्रपती,शिवाजी महाराज यांची जयंती तसेच महाशिवरात्र हा सण येत असल्यामुळे हे सण साजरे करतांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये आगामी सण/ उत्सव शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून करावे यासाठी पोलीस पाटील, शांतता मोहल्ला कमिटी सदस्य,उत्सवाचे मंडळाचे आयोजक /अध्यक्ष यांची बैठक घेतली.खालापूर पोलीस निरीक्षक बी.आर.कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.


यावेळी ते बोलतांना म्हणाले की महाशिवरात्र उत्सवाच्या वेळी महिला मुलींची छेडछाड विनयभंग,अवैध धंदे यासारखे प्रकार होणार नाहीत,त्याच बरोबर या ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे तसेच सुरक्षतेसाठी स्वयंसेवक नेमावे,त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतांना वाहतुकीची कोंडी,शिवाय छ.शिवाजी महाराज यांचे नवीन पुतळे बसवायचे असल्यास शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून बसवण्यात यावे. अदि सूचना यावेळी देण्यात आल्या व मार्गदर्शन करण्यात आले.




थोडे नवीन जरा जुने