ग्रुप ग्रामपंचायत पारगांव तालुक्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
पनवेल दि. १२ ( संजय कदम )  ग्रुप ग्रामपंचायत  पारगांव   तालुका पनवेल व पारगांव  कोल्ही तसेच  पारगांव  डुंगी ग्रापंचायतीच्या  वतीने सामाजिक बांधिलकी जपत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला . 


                    ग्रुप ग्रामपंचायत  पारगांवच्या  सरपंच सौ.  अहिल्या बाळाराम नाईक व पनवेल पंचायत समिती सदस्य सौ रेखा म्हात्रे ,उपसरपंच सौ सुनंदा हरिभाऊ नाईक, माजी उपसरपंच सौ निशा रत्नदीप पाटील ,सौ अंजली राहुल कांबळे ,मनोज राम दळवी, सुशील तारेकर, सामाजिक कार्यकर्ते, बाळासाहेब नाईक, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर मोकल, ऑपरेटर  सोनाली देशमुख, प्रमोद म्हात्रे , देवळे , चंद्रभागा तारेकर, यांच्या उपस्थितीत विधवा महिलांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.  


 पदुबाई नामदेव म्हात्रे वय वर्ष 75 तसेच कार्यक्रम गुड लाईफ आरोग्य संस्थेतर्फे आरोग्य मार्गदर्शन डॉक्टर सौ सुगंधरा किरण ठाकूर बीए बी इ डी हेल्प कोच डॉक्टर  किरण काशिनाथ ठाकूर, बीकॉम हेल्प कोच डॉक्टर उमेश पद्माकर पाटील ,बीए हेल्प कोच आरोग्यासाठी २०० महिला वर्ग उपस्थित होत्या आरोग्यासाठी माहिती चांगल्या प्रकारे उपलब्ध करून कौतुकास्पद देण्यात आली . तसेच  राजेंद्र पावसकर गुरुजी हिंदू राष्ट्र जागृत सभा यांच्याकडून उपस्थितांना  माहिती देण्यात आली त्यामध्ये हिंदूंवर कोणताही अन्याय होणार नाही देशात सर्वांना समान न्याय मिळेल अवैद्य धर्मांतराबंदी किंवा गोहत्या बंदी यासारखे कायदे तात्काळ लागू होतील 


हिंदू माता भगिनीकडे वक्रदृष्टीने पाहण्याचे कोणते धाडस होणार नाही हिंदुराष्ट्र स्थापन करणे छत्रपती शिवाजी महाराज मूटभर मावळ्यांसह हिंदवी स्वराज्य स्थापन करू करू शकतात तर शंभर कोटी हिंदूंचे एका भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात निश्चित भाग पाडू शकाल असे त्यांनी सांगितले . यावेळी पारगाव येथील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे धमके हॉस्पिटल पनवेल च्या डॉ. म्हात्रे यांच्याकडून ताप ,थंडी, सर्दी, खोकला व  इतर आजारा  बाबत काय काय काळजी घ्यावी याबाबतची माहिती त्यांच्या कडून देण्यात आली . अश्या प्रकारे वेगवेगळे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घेऊन  सरपंच सौ. अहिल्या बाळाराम नाईक  व त्यांच्या  सहकार्यांनी  हळदी कुंकू समारंभ साजरा केला . 

थोडे नवीन जरा जुने