रिया पापड उद्योगातून महिला वर्गांस रोजगारकाशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १७ फेब्रुवारी, रोजच्या दैनंदिन जिवनात जेवण करतांना प्रत्येक जण पापड हे आपल्या ताटात असते.या बाबीचा विचार खादी ग्राम उद्योग मधून ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले.त्याच बरोबर या व्यवसायांचा सखोल आभ्यास करुन नारंगी येथिल रवी देशमुख,तेजश्री देशमुख यांनी पंधरा प्रकारचे पापड तयार करण्यात येत असून यांस मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे हा पापड व्यवसाय सुरु केला.या माध्यमातून महिला वर्गांस रोजगार उपलब्ध झाला असल्यांचे त्यांनी प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.


              आज व्यवसाय कोणताही करा मात्र त्यासाठी त्या व्यवसायामध्ये स्वताला झोकून दिले पाहिजे.हा व्यवसाय करतांना कोणतेही कौशल्य नसूनही फक्त आत्मविश्वास वर हा व्यवसाय सुरु केला.यासाठी पापड निर्मिती साठी महिला वर्गांचे शारीरिक श्रम कमी व्हावे यासाठी टेकनॉली मशिनरी वापरण्यात आले आहेत.आपला व्यवसाय वाढतच जाणार या मध्ये तिळ मात्र शंका नाही कारण आम्ही उत्तम प्रकारचे चांगल्या पद्धतीचे पापड निर्माण करीत असल्यांचे त्यांनी सांगितले


             सदर या पापड विक्री बचत गटाच्या माध्यमातून तसेच स्टॉल मधून विक्री केले जाते.त्याच बरोबर किरकोळ विक्री सुद्धा सुरु आहे.सदर या व्यवसायाला एक वर्ष पुर्ण झाल्यांने नुकताच उत्तम व्यवसायीक म्हणून महाराष्ट्र शासन- कृषी विभाग - कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा रायगड अंतर्गत रायगड जिल्हा कृषी महोत्सव येथे सन्मानित करण्यात आले.यावेळी त्यांस शाल,सन्मानचिन्ह उपस्थित मान्यवरांच्या समवेत सन्मानित करण्यात आले .


थोडे नवीन जरा जुने