पाताळगंगा : १० फेब्रुवारी, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सर्व पत्रकार बंधू काळी फित लावून या घटनेचा निषेध करीत आरोपींवर कठोर कारवाई ची मागणी करण्यासाठी खालापूर प्रेस क्लब व तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू यांनी निवेदन देऊन निषेध केला आहे
रत्नागिरी जिल्हयातील महानगरी टाईम्स चे पत्रकार शशिकांत वारीशे यांनी अन्याय विरोधात सतत लिखाण करीत असताना नागरिकांचा विरोध असणाऱ्या रिफायनरी प्रकल्पा बाबत लिखाण करून नागरिकांच्या मागणीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत होते त्याचा राग मनात धरून येथील या प्रकल्पाशी लागेबांधे असणाऱ्या समाज कंठकाने सकाळी बातमीच्या शोधात निघालेल्या पत्रकार वारीशे यांच्या दुचाकीला महिंद्रा थार गाडीची जोरदार धडक दिल्याने यात त्याचा जबर मार लागून मृत्यू झाला
या घटनेत अपघात नसून घातपात आहे हे स्पष्ट आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकार आक्रमक झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सर्वत्र ठिकाणी निषेध नोंदवत निवेदन दिले आहे याचं अनुषंगाने खालापूर प्रेस क्लब च्या वतीने खालापूर तालुक्यातील पत्रकार बंधू यांनी या घटनेचा निषेध केला आहे
यावेळी खालापूर प्रेस क्लब चे अध्यक्ष तथा रायगड प्रेस क्लब चे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे जेष्ट पत्रकार भाई ओव्हाळ,रवींद्र मोरे, हनुमंत मोरे ,अरुण नलावडे,समाधान दिसले,राज साळुंके,प्रसाद अटक नवज्योत पिंगळे यासह अन्य पत्रकार बंधू यांनी तहसीलदार आयुब तांबोळी,पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांना निवेदन देऊन कठोर कारवाई ची मागणी केले आहे
Tags
पाताळगंगा