महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचां वाढदिवस साजरा केला




महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशीच म्हणजे 9 फेब्रुवारी 2022 रोजी, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन समारंभ, कळंबोली येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

अनेक कार्यकर्ते,नागरिक तसेच शुभेच्छुक या कार्यक्रमाला उपस्थित होते. शुभेच्छा देण्यासाठी, मोठा जन समुदायने या कार्यक्रमास हजेरी लावली.




बाळासाहेबांचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत यांच्या हस्ते तसेच मुख्य अतिथी म्हणून बाळासाहेबांचीं शिवसेना पक्षाचे सचिव श्री संजय मोरे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री प्रशांत ठाकूर, शिक्षक मतदार संघाचे श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थित शुभारंभाचीं फीत कापण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांनी श्री रामदास शेवाळे यांचे तोंड भरून कौतुक करून, सर्व बाळासाहेबांच्या शिवसेनेकांना व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन येणाऱ्या काळात पनवेल महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने काम करण्याचे आव्हान केले. त्याचप्रमाणे त्यांनी श्री प्रशांत ठाकूर (आमदार पनवेल मतदार संघ), यांच्या कार्याचे व युतीचे कार्य करण्यामध्ये जे योगदान दिल्या बाबत जाहीरपणे आभार व कौतुक केले.



कार्यालयच्या परिसरामध्ये एक वेगळच माहोल तयार झालेले होते आणि विरोधकांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे एक नवीन व दमदार पावलाची सुरुवातीची झलक-संदेश, या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नक्कीच मिळाला असा विस्वास सर्व कार्यकर्त्यामध्ये पसरला होता.



जय महाराष्ट्र 🙏
थोडे नवीन जरा जुने