उलवे नोडमध्ये ‘जाणता राजा’ला मानाचा मुजरा






पनवेल(प्रतिनिधी) जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पनवेल तालुक्यातील गव्हाण-कोपर तसेच उलवे नोड येथे कार्यक्रमांचे आयोजन करून महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


गव्हाण-कोपर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. उलवे नोडमधील खारकोपर रेल्वेस्थानकासमोर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. तेथेही रयतेच्या राजाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष जे. एम. म्हात्रे, अरुणशेठ भगत, सरचिटणीस महेंद्र घरत, गव्हाणच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, वसंत म्हात्रे, जयवंत देशमुख, किशोर पाटील, अनंता ठाकूर, न्हावे



 ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, विश्वनाथ कोळी, मनोज घरत, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, सुनिता घरत, उषा देशमुख, अर्चना मिश्रा, सुजाता पाटील, आनंद देशमुख, कमलाकर देशमुख, वसंत पाटील, सुधीर ठाकूर, जयश्री घरत, अशोक कडू, व्ही. के. ठाकूर, पी. के. ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. चौक येथील प्रशांत शांताराम देशमुख यांनी लिहिलेल्या जय शिवराय या पुस्तकाच्या चौथ्या आवृतीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी लोकनेतेे रामशेठ ठाकूर यांनी मार्गदर्शन करून सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.




थोडे नवीन जरा जुने