स्वर्गीय मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ मोफत रुग्णवाहिका सेवा; लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार लोकार्पण
पनवेल(प्रतिनिधी) स्वर्गीय मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ कामोठेतील रवीशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी बुधवार दिनांक २२ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता मोफत रुग्णवाहिका लोकार्पित करण्यात येणार असून भजनी मंडळाला वाद्य साहित्य तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था भेट आदी स्वरूपाच्या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.             माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा कामोठेतील सेक्टर ३५ मधील श्री गणेश मंदिर या ठिकाणी होणार आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा
 सरचिटणीस नितीन पाटील, श्रीनंद पटवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, दिलीप पाटील, विकास घरत, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, शिला भगत, कुसूम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, राजेश गायकर, हॅप्पी सिंग, विद्या तामखेडे, हर्षवर्धन पाटील, सुशील शर्मा, महिला मोर्चाच्या कामोठे मंडल अध्यक्षा वनिता पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ जोशी यांनी दिली असून या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 
थोडे नवीन जरा जुने