चाईल्ड केअर करतोय पुण्याचे काम.

उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड या सामाजिक संस्थेने आज पर्यंत अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवलेत.समाजातील सर्वच घटका पर्यंत संघटना वेगवेगळ्या उपक्रम, कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचत आहे.कु मानव विजय ठाकूर (केळवणे, पनवेल )या मुलाच्या आजारासाठी आर्थिक मदतीचे आव्हान सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला केले होते.त्याला जनतेनी चांगला प्रतिसाद दिला. चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड हि संस्था आत्ता उरण तालुक्या बाहेरहि समाज सेवेचे कार्य करत आहे.पनवेल तालुक्यातील केळवणे गावातील कु. मानस विजय ठाकूर वय वर्ष 2 यांस गंभीर आजाराने ग्रासले आहे. वडील विजय ठाकूर याचे हातावर पोट असल्याने ते सध्या होडीवर हजेरीने काम करत आहे. त्यात त्याची परिस्थिती हि खूप हलाकीची आहे. तरी त्याने मानस झाल्या पासून त्यांच्या परिस्थिती प्रमाणे मानस याच्यावर मानस चे जन्म झाल्यापासून हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांमार्फत इलाज चालू ठेवले आहे


. परंतु आत्ता मात्र ते पुरते हतबल झाले आहेत.यासाठी चाईल्ड केअर सामाजिक संस्थेला ग्रामस्थ विजय ठाकूरने मदतीचा हात मागितला होता त्यासाठी चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड तर्फे मानस ठाकूर या लहान मुलाला मदत करावे असे जनतेला आव्हान केले. आणी रविवार दि 19/2/2023 रोजी केळवणे येथे मानस ठाकूर यांच्या घरी जाऊन त्यांच्या आजाराबाबत विचारणा केली.व यावेळी मुलाच्या पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली. आर्थिक मदत मुलाच्या आई वडिलांकडे सुपूर्द केली.या वेळी चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष - विकास कडू,मीडिया सल्लागार विठ्ठल ममताबादे, कार्याध्यक्ष विक्रांत कडू, उपाध्यक्ष तुषार ठाकूर, सदस्य आमोल डेरे, रोशन धुमाळ आणी विवेक कडू उपस्थित होते. तसेच केळवणे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या समाजसेवे बद्दल चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
"समाज सेवा म्हणजे ईश्वर सेवा, ती करताना मंदिरात देवाची पूजा करतो हीच जाणीव झाली पाहिजे. आज कु. मानस ठाकूर या लहान मुलाला मदत करणारे अनेक दानशूर व्यक्तींना मी चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण रायगड च्या वतीने आभार मानतो त्यांच्यामुळेच आज हे समाज कार्य चाईल्ड केअर संस्था करू शकली."असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांनी यावेळी बोलताना सांगितले.


थोडे नवीन जरा जुने