स्वाभिमान युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती


स्वाभिमान युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली. पनवेल महानगरपालिका आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाला त्यांनी उपस्थिती दर्शविली. त्याचप्रमाणे स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटना उरण नाका आयोजित शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाला महेश साळुंखे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली. त्याचप्रमाणे गणेश नगर करंजाडे येथील शिवजयंतीला उपस्थिती दर्शवून त्यांनी महाराजांना अभिवादन केले . प्राथमिक शाळा वडघर येथील आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे रमाई नगर वडघर आयोजित वडघर बुद्धविहार येथील शिवजयंतीला त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली . स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक आगामी 20 मार्च 2023 या क्रांती दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पार पाडली . या बैठकीत महाराष्ट्रातील दलित चळवळीतील सर्व लोक कलावंतांचा सत्कार करण्याचा ठराव घेण्यात आला . त्याचप्रमाणे आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांचा सत्कार करण्याचाही ठराव घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महेश साळुंखे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे उपस्थित होते. त्याचप्रमाणे 20 मार्चच्या कार्यक्रमाकरिता जास्तीत जास्त लोकांना नेण्या आणण्याची व्यवस्था करण्याचा ठराव घेण्यात आला.


थोडे नवीन जरा जुने