क्रांतिदिननिमित्त उपस्थित राहण्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे व नानासाहेब ईंदिसे यांना निमंत्रण

पनवेल दि.२३ (वार्ताहर) : 20 मार्चच्या क्रांती दिनाच्या अनुषंगाने स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाड येथे आयोजित कार्यक्रमाला माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे व एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब ईंदिसे यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले आहे. महाड येथील क्रांती दिनानिमित्त जाहीर सभेचा कार्यक्रम स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे व कार्याध्यक्ष विजय धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त या कार्यक्रमाला माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे व एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब ईंदिसे यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून सभेला मार्गदर्शन करण्याचे निमंत्रण रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले आहे.
 तसेच चंद्रकांत हंडोरे यांची राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल महेश साळुंखे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
थोडे नवीन जरा जुने