शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे राबवणार शिवसंवाद अभियान






पनवेल दि. २१ (संजय कदम) : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा-१८८ मधील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी यांची येत्या ३ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या शिवसंवाद अभियान राबविण्यात आहे. या अनुषंगाने आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सर्व पदाधिकारी यांना या शिवसवांद अभियान बद्दल सर्व माहिती दिली.



या बैठकीस जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, माजी जिल्हाप्रमुख माधव भिडे, सल्लागार शिरीष बुटाला, जेष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख संदीप तांडेल, ज्ञानेश्वर बडे, विश्वास पेटकर, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर संघटक शशिकांत डोंगरे, उपमहानगर प्रमुख आत्माराम गावंड, प्रकाश गायकवाड, रामदास गोंधळी, प्रभाकर गोवारी, किरण तावदरे, सर्व शहर प्रमुख, सर्व उपशहर प्रमुख




, विभाग प्रमुख, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटीका सौ. कल्पना पाटील, तालुका संघटीका सौ. सुजाता कदम, उपमहानगर संघटीका सौ. रीना पाटील, संचीता राणे, युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, विधानसभा अधिकारी पराग मोहिते यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




थोडे नवीन जरा जुने