खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध खोटे आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा; युवासेनेने नवी मुंबई पोलीस उपायुक्तांना दिले निवेदन





पनवेल दि.२३ (वार्ताहर) : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी खोटे आरोप करत उपमुख्यत्र्यांकडे पत्र दिले होते. त्यासंदर्भात युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रुपेश पाटील यानी नवी मुंबई पोलीस उपायुक्तांकडे निवेदन देऊन गुन्हा दाखल कर्णयंतची मागणी केली आहे.




                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता आणि पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. ह्यामुळे व्याकुळ झालेल्या संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आली असल्याचा आरोप केला होता. 




त्यामुळे संजय राऊत यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रुपेश पाटील यानी नवी मुंबई पोलीस उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी पनवेल उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, उपमहानगर प्रमुख रोशन पवार, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब उपस्थित होते. या निवेदनात, संजय राऊत रोज सामजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करतात, शिवसेना नेत्यांवर पुरावे नसतांना आरोप करतात ह्यामधून कार्यक्रत्यांमध्ये संताप निर्माण होत आहे, राजकिय वातावरण असंतुलित होत आहे. ह्यासाठी सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.



थोडे नवीन जरा जुने