मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली कामाची दखल; लक्ष्मीनगर वसाहतीमधील रहिवाश्यांच्या आशा झाल्या पल्लवित




पनवेल दि.२३ (वार्ताहर) : पनवेल एस.टी स्टँड समोरील जागेत राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्ते बाधित दुकाने व घरे तोडण्यात आली होती. मात्र त्याचा मोबदला तेथील रहिवाश्यांना मिळला नव्हता. शिवसेना रायगड जिल्हासंपर्क प्रमुख रामदास शेवाळे तसेच झोपडपट्टी व जीर्ण चाळी स्थानिक रहिवाशी संघटनेचे भरत जाधव यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यालयाशी पत्रव्यवहार करून त्यांना योग्य तो मोबदला देण्याची मागणी केली होती. याची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  




 पनवेल येथील लक्ष्मी वसाहतीत भूखंड क्रमांक १८८, १८९ आणि २०२ एक येथे ७० ते ८० वर्षांपासून स्थानिक रहिवासी आहोत. सदरची जागा ही नंदिनीबाई प्रतापसिंह चव्हाण या खाजगी मालकीची आहे. दरम्यान महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी पनवेल महानगरपालिका व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्या संयुक्त मताने या ठिकाणची ६० ते ६५ दुकाने आणि काही घरे तोडण्यात तोडली आहेत



. मात्र या मोबदल्याबाबत महापालिकेने सदरची जागा ही खाजगी मालकीची असल्यामुळे त्याचा मोबदला महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ या कार्यालयाकडून घेण्याचे आदेश दिले आहे. सर्व प्रकारचे कागदपत्र असून देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा मोबदला येथील रहिवाश्यांना दिलेला नाही. त्यामुळे शिवसेना रायगड जिल्हासंपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी व जीर्ण चाळी स्थानिक रहिवाशी संघटनेचे भरत जाधव यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे या अन्यायाबाबतचे पत्र देऊन न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ या पत्राची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच यासंदभातील शासकीय अडथळा दूर होऊन रहिवाश्यांना लवकरच न्याय मिळेल अशी आशा जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.



थोडे नवीन जरा जुने