गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर शोधणे पडले महागात; महिलेची ७५ हजारांची फसवणूक




पनवेल दि.२४ (वार्ताहर) : गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर शोधून संपर्क साधणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे. अज्ञात व्यक्तीने युपीआय आयडी व मोबाइल कमांकद्वारे महिलेची ७५ हजारांनी ऑनलाईन आर्थिक फसवणुक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने तात्काळ धाव घेत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



मील्क बास्केट अँपच्या माध्यमातून काही स्कीम मिळत नसल्या कारणाने सदर फिर्यादी महिलेने गुगलवर मील्क बास्केट अँपच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च करून संपर्क साधला असता अज्ञात व्यक्तींनी स्किममधील पैसे रिफंड मिळण्याकरिता फिर्यादीच्या व्हाटसअप कमांकावर फॉर्म पाठवुन देवुन त्या मध्ये फिर्यादी यांचे बँकेचा युपीआय आयडी व मोबाइल कमांक व इतर माहीती भरण्यास सांगून त्याद्वारे ७४ हजार २९९ रुपये परस्पर काढून घेऊन ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली.


थोडे नवीन जरा जुने