चालकानेच केला १ लाख ११ हजाराचा अपहार
पनवेल दि.२४ (संजय कदम) : किराणा माल वाहतूक करणाऱ्या चालकानेच ग्राहकाकडून मिळालेले पैसे कंपनीमध्ये परत जमा न करता अपहार केल्याची घटना पनवेल तालुक्यातील रोहींजण येथे घडली आहे. याप्रकरणी सदर चालकाविरोधात तळोजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


   
जयदिप पवार (वय २७) यांचा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय असून त्यांनी दिलशर कंपनी व अदानी कंपाउड या ठिकाणी १ लाख ११ हजार ७६ रुपये किमतीचा किराणा माल पोहोच केला होता. या मालाचे पैसे ग्राहकांनी चालक अजमल हुसेन रेशम अली याच्याकडे सुपूर्द केले. ग्राहकाकडून मिळालेल्या डिलेव्हरीचे पैसे कंपनीमध्ये परत जमा करणे अपेक्षीत असताना त्याने सदर रक्कम कंपनीमध्ये न भरता अपहार केला. याप्रकरणी जयदीप पवार यांनी चालक अजमल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


थोडे नवीन जरा जुने