महाशिवरात्रीनिमित्त फराळाला महागाईची झळ




धार्मिक महत्त्व असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक उपवास करतात. या पार्श्वभूमीवर फराळाच्या पदार्थांना मागणी वाढणार असल्यामुळे दरांमध्ये तेजी बघायला मिळत आहे. आवक मर्यादित असताना शेंगदाण्यालाही वाढती मागणी लक्षात घेता प्रतिकिलो दीडशेपार गेला आहे; तर साबुदाण्यानेही प्रतिकिलो पंचाहत्तरी गाठली आहे.



महाशिवरात्रीनिमित्त शहरी भागात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. यानिमित्ताने फराळाच्या पदार्थांचे वाटप केले जाते, तर घराघरात उपवास केला जात असल्याने किरकोळ बाजारात साबुदाणा, शेंगदाणा, राजगिरा, खजूर आणि फळांच्या मागणीमध्ये वाढ होते. रोजच्या स्वयंपाकासह उपवासात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा गेल्या काही दिवसांपासून तेजीत आहे.



 महिन्याभरात शेंगदाणा दरात किलोमागे 15 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. 110 ते 120 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणारा शेंगदाणा सध्या 130 ते 140 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. नवीन आवक दाखल होईपर्यंत दरांत तेजी कायम राहणार, असा अंदाज व्यावसायिकांनी वर्तवला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ 60 ते 65 रुपये प्रतिकिलोने विक्री होणारा साबुदाणा सध्या 72 ते 75 रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. येत्या काही दिवसात दरांत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


थोडे नवीन जरा जुने