मोहाची घोंगडी वाडीतील महिला भाजपमध्ये वाडी

नेरळ ग्रामपंचायतीमधील कोंबलवाडी आणि मोहाची वाडी येथील महिला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला संघटन आणखी मजबूत करण्यासाठी व व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मितीमधून आर्थिक दृष्ट्या सक्षम होता यावे यासाठी या भागातील महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.


पक्षाच्या नेरळ चिंचआळी येथील कार्यालयात मोहाची वाडी आणि कोंबल वाडी येथील शंभरहून अधिक महिलांनी कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर 
यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. भाजप कार्यकर्ते नितीन कांदळगावकर यांच्या कार्यालयात झालेल्या प्रवेश कार्यक्रमाला भाजप किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, भाजप कर्जत तालुका सरचिटणीस संजय कराळे, युवा नेतृत्व किरण ठाकरे, कर्जत शहर अध्यक्ष नगरसेवक बळवंत घुमरे, कर्जत पंचायत समिती माजी सदस्य नरेश मसणे, नेरळ जिल्हा परिषद गट अध्यक्ष संदिप म्हसकर, नम्रता कांदळगावकर, नेरळ ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा कराळे आदी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने