माणगावची कलिंगडे सातासमुद्रापार




शेती म्हणजे तोट्याचा धंदा, अशी ओळख निर्माण झाली आहे. माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन हजार एकर क्षेत्रात पिकाची योग्य निवड, लागवड आणि जोडीला आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन या जोरावर प्रत्येकी 15-20 टन कलिंगडाचे पीक घेतले आहे. वीस-वीस किलोचे एक कलिंगड अशा प्रकारे पीक तयार झाले आहे. या फळांना युरोपीय देशात मोठी मागणी असून, ही कलिंगडे सातासमुद्रापार विक्री करुन लाखो रुपयांची उलाढाल केली आहे.



तालुक्यात सुमारे 2 हजार एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी विविध वाणाच्या कलिंगडाची लागवड केली आहे. हा शेतकरी नवनवीन होणारे तंत्रज्ञान व कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सल्ला घेत उत्पादन घेत आहे. कमी पाण्यावर आता 100 टक्के शेतकरी ठिंबक व मल्चिंग पेपरचा वापर करून आधुनिक पद्धतीने कलिंगडाचे पीक घेत आहे. तालुक्यात शेतकरी सरासरी एकेरी 15 ते 20 टन उत्पन्न घेत आहेत. गेली दोन वर्षे नोन-यु-सीड्स प्रायव्हेट लि. या कंपनीच्या या जातीचे सफेद पट्टा असणारे हे फळ चवीला गोड असून माणगाव तालुक्यातील दहिवली, पाणोसे, गोरेगाव याठिकाणी पिकवले आहे. नोन-यु-सीड्स या कंपनीच्या सुप्रिम कलिंगडला पश्चिम महाराष्ट्रात गिरीश या नावाने ओळखले जाते.



 कोकणात सुप्रीम म्हणून ओळखले जाते. हे फळ लाल रंगाचे असून, चवीला गोड आहे. 55 दिवसांत हे फळ विक्रीसाठी तयार. माणगावातील शेतकऱ्याला एक फळ तब्बल 20 किलो वजनाचे भरले आहे. या फळाला युरोपियन देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील वर्षी दिपेश बाळाराम लाखाडे व महेंद्र शिंदे या शेतकऱ्यांनी दहिवली येथून शेतातून कंटेनर भरून थेट न्हावाशेवा बंदरातून दुबई येथे पाठवले. त्याकरिता त्यांना चांगला भाव मिळाला होता.


थोडे नवीन जरा जुने