सिडको, ग्रामपंचायत, वाहतूक पोलीस कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक शहरात खरेदीसाठी येत असल्याने पनवेल शहरातील मधील उरण नाका बाजार परिसरात मोठी गर्दी होत आहे. मात्र गेल्या दोन दिवस वडघर पुलाजवळ एकतर मोठंमोठे खड्डे तर दुसरीकडे नव्याने सुरु झालेला "रायगड वडापाव दुकानाबरोबर इतर दुकानांच्या अतिक्रमाणामुळे वाहतूक कोंडी होतं असल्याचे प्रवाश्याचे म्हणणं आहे. त्यामुळे सदर दुकान चालकावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पनवेल परिसरातील उरण नाक्यावर वाहतूक कोंडी हि नित्याचीच आहे. येथे कधीही जावे तर वाहतूक कोंडी जाणवतेच. ज्या दिवशी येथे वाहतूक कोंडी जाणवणार नाही त्या दिवशी वाहनचालकांना चुकल्या सारखे वाटेल इतकी वाहतूक कोंडीची सवय नागरिकांच्या अंगवळणी पडली आहे. त्याचबरोबर पनवेल उरण रस्त्यावरील गाढी नदीवरील पूल धोकादायक असल्यामुळे बंद अवस्थेत असल्यामुळे एकाच पुलावरून वाहतूक सुरु आहे.
त्यामुळे या पुलावर वाहतूक संख्येत भर पडत आहे. त्याचबरोबर पुलाच्या पुढे मोठं मोठे खड्डे पडले असल्याकारणाने वाहतूक संथ गतीने धावत आहे. त्याचबरोबर वडघर परिसरात गाढी नदीच्या पुढे नव्याने सुरु झालेल्या रायगड वडापाव दुकानासह इतर दुकानदारांनी आपले बस्तान रस्त्यावर मांडले असल्याकारणाने वाहतूक कोंडी होत आहे. सायंकाळच्या सुमारास सुमारे दोन ते तीन तास वाहतूक कोंडीच्या त्रासला वाहनचालकांना सामोरे जावे लागले होते. मात्र वडघर परिसरात देखील वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होतं असल्यामुळे सिडको, ग्रामपंचायत, आणि वाहतूक पोलिसांनी लवकरात लवकर मार्ग काढून उपाययोजना करावे अशी मागणी येथील नागरिक व प्रवाश्याकडून करण्यात येत आहे.
Tags
पनवेल