नवी मुंबई
दिनाक १/२/२०२३
रबाळे पोलीस स्टेशन, नवीमुंबई हददीत मोटार सायकल चोरी करणा-या एका सराईत आरोपीस गजाआड करून एकुण 19 गुन्हे रबाळे पोलीसांनी केले उघड
*थोडक्यात हकीकतः*
रबाळे पोलीस ठाणे हददीतुन सुझुकी ॲक्सेस, होंडा अॅक्टीवा, युनिकॉर्न, होंडा शाईन, पॅशन प्लस, पॅश्न प्रो, बजाज पल्सर, एव्हेजर इ. मोटार सायकल व स्कुटी चोरीस गेले बाबत गुन्हे दाखल होते.
*सदरचे गुन्हे उघडकीस* आणण्यासाठी मा.पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे सो यांच्या आदेशाने मा. पोलीस सह आयुक्त श्री.संजय मोहिते, सो मा.पोलीस उपायुक्त श्री.विवेक पानसरे साो, परिमंडळ 1 वाशी, मा.सहा.पोलीस आयुक्त श्री. डी. डी. टेळे वाशी विभाग व रबाळे पो. ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. डी. ढाकणे यांचे मार्गदर्शनाखाली नवी मुंबई हद्दीमध्ये वाढत्या मोटर सायकल चोरीच्या गुन्हयास आळा घालण्यासाठी व आरोपीतांना पकडण्याकरीता योग्य त्या विशेष सूचना देण्यात आल्या होत्या.
*गुन्हयाची उकल* :
मा.वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने वपोनि / डी.डी. ढाकणे, पोनि / बी.एन.औटी (गुन्हे) यांचे अधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मोटर सायकल चोरीच्या घटना जास्त प्रमाणात घडणा–या ठिकाणी सातत्याने वॉच ठेवणेची व घडलेल्या गुन्हयांचा अभ्यास करणेची कार्यवाही सुरू केली होती. दि. 22/01/2023 रोजीच्या वॉच कार्यवाही दरम्यान एक इसम एका दुचाकीवरून येवुन तो हातात पिशवी घेवुन तो ऐरोली रेल्वे स्टेशन समोर पार्क असणा-या दुचाकी वाहनांची संशयास्पद हालचाली करीत होता. वॉचकामी असणा–या पथकाने त्यास पकडले असता त्याचे ताब्यात एक पिशवी मिळुन येवुन त्यामध्ये मोटर सायकलच्या चाव्या, स्कु ड्रायव्हर, कटर, पकड इत्यादी संशयास्पद साहित्य दिसुन आले.
त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याचे स्वतःचे गोळीबार रोड घाटकोपर पश्चिम, मुंबई येथे फ्रेंडस ऑटो गॅरेज असल्याचे व तो मोटर सायकल मॅकेनिक असल्याचे समजले. नवी मुंबई हद्दीत वाशी, नेरुळ, सिबीडी, बेलापूर, खारघर पोलीस ठाणे आणि मुंबई शहर हद्दीतील अंधेरी, मेघवाडी, आझाद मैदान, पवई, पार्क साईट पंतनगर पोलीस ठाणे तसेच कासारवडवली पोलीस ठाणे जि. ठाणे शहर इत्यादी पोलीस ठाणे येथे एकूण 46 मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे व वाशी पो. ठाणेकडुन 02 वर्षासाठी नवीमुंबई व ठाणे जिल्हयातुन हददपार केलेले होते अशी माहिती समजुन आली.
रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 604/2022 भादवि. कलम 379 या गुन्हयातील प्राप्त घटनास्थळ सीसीटिव्ही फुटेजमधील होंडा शाईन मोटार सायकल चोरी करणारा इसम हाच सराईत इसम असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हयात दिनांक 23/01/2023 रोजी 01:20 वाजता अटक केली आहे. अटक आरोपीची दिनांक 01/02/2023 रोजी पोवतो पोलीस कोठडी मंजुर असुन त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये अदयाप पोवतो 27 मोटार सायकल जप्त केले आहे. तसेच त्याने चोरी केलेल्या 08 मोटार सायकल बेवारस स्थितीत मिळुन यापुर्वीच जप्त केलेले आहेत. आरोपीने अजुन 15 मोटार सायकल चोरी केल्याचे असल्याची कबुली दिली असुन तपासिक अधिकारी सपोनि/दिपक खरात हे पुढील अधिक तपास करीत आहेत.
गुन्ह्यांची कार्यपद्धत :- बनावट चावी व्दारे मोटर सायकलची चोरी, आरोपीचे मोटर सायकलचे गॅरेज असल्याने त्याचेकडे इंजिन व चेसिस नंबर दुरुस्तीसाठी आलेल्या मोटार सायकलचे इंजिन, इंजिन पटटी व चेसिस बदलुन व चोरी केलेल्या मोटार सायकलचे पार्ट दुरुस्तीस आलेल्या मोटर सायकल यांना लावुन त्याची विक्री करणे तसेच चोरलेल्या मोटर सायकलीचे सुटटे पार्ट विक्री करणे, भंगार स्क्रॅप दुकानदार यांना विक्री करून पुरावा नष्ट करणे असे कृत्य नमुद आरोपीने चोरी केलेल्या मोटार सायकल बाबत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक आरोपी :
नासीर सद्दन खान वय 58 वर्ष धंदा-गॅरेज काम रा. नर्मदा सोसायटी, रूम नंबर 02 पार्क साईट विक्रोळी मुंबई
यास दिनांक 23/01/2023 रोजी 01:20 वाजता अटक केली असुन दिनांक 01/02/2023 पावेतो पोलीस कोठडी मंजुर आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि/दिपक खरात हे करीत आहेत.
*हस्तगत माल :*
9,20,200/- रूपये किंमतीच्या 27 मोटार सायकल त्यामध्ये अॅक्टीव्हा, अॅक्सेस, युनिकॉर्न, अॅवेंटर, होंडा पॅशन जप्त.
*उघडकीस आलेले गुन्हे*:
1) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 604 / 2022 भादवि कलम 379, 201 2) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 250/2022 भादवि कलम 379 3) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 306/2022 भादवि कलम 379 4) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 480 / 2022 भादवि कलम 379 5) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 358/2022 भादवि कलम 379 6) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 203 / 2022 भादवि कलम 379 7) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 296/2022 भादवि कलम 379 8) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 272/2022 भादवि कलम 379 9) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 634 / 2022 भादवि कलम 379 10) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 31/ 2022 भादवि कलम 379 11) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 44 / 2022 भादवि कलम 379 12) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 89/2022 भादवि कलम 379 13) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि.नंबर 277 / 2022 भादवि कलम 379 14) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि.नंबर 288/2022 भादवि कलम 379 15) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 304 / 2022 भादवि कलम 379 16) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 308/2022 भादवि कलम 379 17) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 331/2022 भादवि कलम 379 18) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि.नंबर 512/2022 भादवि कलम 379 19) रबाळे पोलीस ठाणे गु.रजि. नंबर 529/2022 भादवि कलम 379
सदरची कारवाई रबाळे पोलीस ठाण्याचे वपोनि / डी.डी. ढाकणे, पोनि / भागुजी औटी (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी सपोनि/दिपक खरात, सफौ/नामदेव मानकुंबरे, पोहवा / 1761 दर्शन कटके, पोना / 3146 गणेश वीर, पोशि/12029 यादवराव घुले, पोशि/3577 प्रविण भोपी, पाशि/3578 मनोज देडे यांनी केली आहे.
*पोलीसांकडुन आवाहन* :
नागरीकांनी आपली वाहने सुरक्षित सी. सी. टिव्ही कॅमेरे असलेल्या पार्कीगमध्ये पार्क करावी. वाहनांना चोरी प्रतिबंधक होणेसाठी हॅण्डल लॉक, सायरन, जी.पी.एस सिस्टीम यंत्रणा यांचा वापर करावा. सोसायटी सभासद यांनी कमिटी सदस्य यांचेशी समन्वय साधुन सोसायटी आवारात पार्कींग बाबत योग्य नियोजन करून पार्किंगची व्यवस्था करावी परंतु सोसायटी आवाराच्या बाहेरील बाजुस उघडयावर पार्किंग करण्याचे टाळावे असे पोलीसांकडुन आवाहन करण्यात येत आहे.
Tags
पनवेल