पनवेल दि.१९ (संजय कदम) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तळोजा येथील कमलगौरी हीरू पाटील शिक्षण संस्थेत चेअरमन बबनदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभर साजरी होत आहे. यानिमित तलोजा येथील कमलगौरी हीरू पाटील शिक्षण संस्थेत महाराजांच्या जयंती निमित्त संस्थेचे चेअरमन आणि जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालत अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी-जय शिवाजी घोषणा देत परिसर दुमदुमला. यावेळी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
Panvel