पनवेल दि.१९ (संजय कदम) : अखंड हिंदुस्थानचे आरध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तोंडरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवाला शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांनी भेट दिली तसेच महाराजांना मानवंदना करून दर्शन घेतले.
यावेळी रक्तदान शिबिराचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते उद्द्घाटन करण्यात आले तसेच डीएव्ही पब्लिक स्कूल तोंडरे येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, उपशहर प्रमुख तळोजा हरेश पाटील, शाखा प्रमुख महेंद्र पाटील आदी पदाधिकारी तसेच डीएव्ही पब्लिक स्कूल चे शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : रक्तदान शिबीर
Tags
पनवेल