सामाजिक क्षेत्रातल्या जिगरबाज रणरागिणी नमिताताई शर्मा यांच्या वतीने साई मंदिर वहाळ येथे साकारला गेला अनोखा कार्यक्रम.






 ऍशिड हल्ल्यातील जखमी व्यक्तींना केली मदत.

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )सामाजिक बांधिलकीची जाण आणि समाजसेवेचं भान असणारी व्यक्तिमत्व आणि सामाजिक संस्था आज पण आपला सामाजिक वारसा जपत समाजात अनेक लोकहितांची कामं करत आपलं अनमोल योगदान देत असतात ! त्यातलाच एक आदर्शवत नाव नमिताताई शर्मा आरोग्य क्षेत्रात नमिता फिटनेस हबच्या नावाने आपलं ब्रँड विकसित करणाऱ्या या युवा तरुणीने सामाजिक क्षेत्रात सुद्धा आपल्या उल्लेखनीय कामगिरीने एक आदर्श निर्माण केला आहे.


समाजात वावरत असतानां अनेक घटनांना सामोरं जावं लागलं.अश्यातच काही व्यक्तींच्या आणि खास करून युवा तरुणींच्या जीवनात भयंकर घटना घडून त्यांचं सारं आयुष्यच उध्वस्त होतं अश्याच महाभयंकर घटनांना अर्थात ॲशिड हल्ल्यात बळी पडलेल्या किंवा त्या मध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना, युवा - युवतींना त्यांच्या पुढील आयुष्यात खंबीरपणे उभं राहण्याचं नवंबळ देणाऱ्या आणि त्यांना सर्वोपरी मदत करणाऱ्या नमिता फिटनेस हबच्या संस्थापिका नमिताताई शर्मा यांनी आज सामाजिक क्षेत्रात आपलं नावं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे.




आज पर्यंत ज्या ज्या व्यक्तीवर ॲशिड हल्ला होऊन ज्यांच ज्यांच आयुष्य उध्वस्त झालं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आज पर्यंत सावरण्याच आणि सहारा देण्याचं काम अगदी तळमळीने आणि आपलेपणाच्या भावनेतून त्या करतं आहेत. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात या लोकांकरिता त्यांच्या भविष्या करिता सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करून समाजात जनजागृती करत असतात.त्यांना विविध प्रकारची मदत करत असतात.आणि या वर्षी नमिताताई शर्मा यांनी याच सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन श्रीसाई देवस्थान साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ दादा पाटील संचलित श्रीसाई मंदिर वहाळ येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमात ॲशिड हल्यात जखमी होऊन वाचलेल्या आणि बळी पडलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वॉशिंग मशीन,टिव्ही,मोबाईल,बिछाने,गृह उपयोगी सामान,किराणा सामान अश्या विविध प्रकारच्या सामनाचं वाटप करण्यात आले.


नमिता फिटनेस हबच्या संस्थापिका नमिताताई शर्मा यांच्या माध्यमातून साकारलेल्या ह्या आदर्शवत कार्यक्रमाच्या आयोजनाच्या वेळी नामिताताई शर्मा यांना रविशेठ पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले.आणि त्यांनी हाती घेतलेला हा अनमोल वसा या पुढेही असाच पुढे चालत राहू दे या करिता त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्या.श्रीसाई मंदिर साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ दादा पाटील, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर,शिरीषदादा कडू, प्रविणदादा कडू आणि नमिता फिटनेस हबचे सर्व सदस्य सोबतच ॲशिड हल्ल्यात जखमी झालेले आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



थोडे नवीन जरा जुने