पनवेल परिसरात आढळला मृतदेह





पनवेल दि.२१(संजय कदम): पनवेल परिसरात उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एक इसमाचा मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहेत.


            बबन आबदारू हिरे(वय ४५) असे या इसमाचे नाव असून रंग सावळा, उंची ५ फूट ५ इंच, चेहरा उभट, बांधा सड पातळ, डोक्यावरील केस काळे वाढलेले, दाढी वाढलेली, नाक सरळ असून त्या इसमाच्या उजव्या हाताच्या पंज्यावर इंग्रजीमध्ये जे. एन असे गोंधळले दिसत आहे. त्याच्या अंगात फुल बाह्याचा सफेद व चॉकलेटी रंगाचा चेक्स असलेला शर्ट व राखाडी रंगाची फुल पॅन्ट आहे.
 या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक-०२२-२४७५२३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक दयानंद महाडेश्वर यांच्याशी संपर्क साधावा.



थोडे नवीन जरा जुने