स्वतःच्या जागेत बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकाम झाल्याने बबन घरत करणार आमरण उपोषण.
 बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे हटविण्याची बबन घरत यांची प्रशासनाकडे मागणी.उरण दि 10 (विठ्ठल ममताबादे ) बबन गोविंद घरत हे मौजे जासई, तालुका उरण येथे राहत असून, बबन घरत यांच्या जासई गावातील सर्व्हे नं. 36 हिस्सा नंबर 13 अ, क्षेत्र 20 गुंठे(अंदाजे किंमत 20 कोटी) या त्यांच्या स्वत:च्या जागेवर इतर लोकांनी अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. त्यामुळे बबन घरत यांना यामुळे शारिरीक व मानसिक त्रास होत आहे शिवाय बळजबरीने जागा बळविल्याने आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे.सदर अतिक्रमणे काढून, बेकायदेशीर बांधकामे पाडून टाकावीत यासाठी बबन घरत यांनी जासई ग्रामपंचायत, पंचायत समिती उरण, जिल्हाधिकारी रायगड, सिडको कार्यालय आदि ठिकाणी पत्रव्यवहार केले होते मात्र शासन या समस्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वयाने जेष्ठ असलेले बबन गोविंद घरत हे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सिडको कार्यालय व कोकण आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.

बबन घरत यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की मा. सर्वोच्य न्यायालयाचा अतिक्रमण काढणे बाबत पूनम राम विरुद्ध मोती राव यांचा निकाल (22/01/2015 )नुसार मला न्याय मिळणे अपेक्षित असून माझ्या मालकीच्या जमिनीत मौजे जासई सर्व्हे नं 36 हिस्सा नं. 13 अ क्षेत्र, 20 गुंठे (अंदाजे किमत 20 कोटी रुपये)येथे माझ्या इच्छेविरुद्ध, माझी कोणतेही परवानगी न घेता केलेले अतिक्रमण तात्काळ निष्काशीत करणे बाबत मी सिडको एमडी, अतिक्रमण विभाग सिडको, कोकण आयुक्त,जिल्हाधिकारी कार्यालय,पालकमंत्री, तहसील कार्यालय उरण,वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे, ग्रामपंचायत जासई या ठिकाणी पत्रव्यवहार केले आहे.सदर विषयांकित माहिती आणि संदर्भ पाहता माझ्या स्वतःच्या मालकीची शेतजमिनीत प्रकाश रामा घरत (मृत), पत्नी ज्योती प्रकाश घरत यांनी घर आणि इमारत बांधली आहे. त्याचप्रमाणे रघुनाथ दशरथ घरत, नरेश दशरथ घरत यांनीही इमारत आणि घर बांधले आहे. सर्वजण राहणारे मु. जासई, ता. उरण, जि. रायगड येथील रहिवाशी आहेत. हे बांधकाम माझ्या इच्छेविरुद्ध, माझी परवाणगी न घेता केलेले माझ्या मालकीच्या जागेत अतिक्रमण आहे


.अत्यंत शांततेच्या मार्गाने मी ताबा घेण्याचा प्रयत्न रोज करीत आहे. याच जागेत मी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जासई ग्रामपंचायत, पंचायत समिती उरण, जिल्हाधिकारी रायगड, परिसरातील शहर नियोजनकार सिडको यांच्याकडे परवानगी मागण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु माझ्याच मालकीच्या जागेत मी घर बांधत असताना अतिक्रमण करणारे (रघुनाथ दशरथ घरत व नरेश दशरथ धरत) मला आरडाओरड करून शिव्या देऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत.मी मालक असलेल्या जागेत शांतता पूर्ण ताबा घेणे हा माझा संविधानिक अधिकार आहे.मला न्याय मिळाला नाही तर मी सिडको कार्यालय व पंचायत समिती समोर आमरण उपोषण करणार असे निवेदनात बबन घरत यांनी म्हंटले आहे.


थोडे नवीन जरा जुने