पनवेल शहर पोलीस ठाण्याचा सलग चौथ्यांदा लोक अदालत मधील समन्स वॉरंट व कोर्ट विभाग प्रथम क्रमांक

पनवेल दि.१६ (संजय कदम) : राष्ट्रीय लोक अदालत मध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्याचा सलग चौथ्यांदा समन्स वॉरंट व कोर्ट विभागामध्ये प्रथम क्रमांक आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. 


                       नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय् परिमंडळ दोन विभागातून सलग चौथ्यांदा लोक अदालत मध्ये समन्स वॉरंट व कोर्ट विभाग पनवेल शहर पोलीस ठाणे यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी संबंधित विभागाचे पो.उप.नि. संजय देशमुख, पो.हवा. युवराज येळे
 पो.हवा. रजनीकांत पगारे, पो.हवा. संजय म्हात्रे, पो.ना. नितीन कुंभार, म.पो.ना. विद्या भगत, पो.ना. नंदकुमार आढारी आदींचे अभिनंदन केले आहे.थोडे नवीन जरा जुने