एम. जी. एम रुग्णालय परिसरात आढळला मृतदेह





पनवेल दि.१६ (संजय कदम) : कामोठे येथील एम. जी. एम रुग्णालय परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध कामोठे पोलीस करीत आहे. 


                   सदर अनोळखी इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४५ वर्षे, डोकीस केस काळे वाढलेले, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे अर्धवट उघडे, तोंड बंद, हनुवटीवर वाढलेली काळी दाढी, दोन्ही हात सरळ, दोन्ही पाय सरळ, उंची ५.फुट५ इंच , काळ्या रंगाची पॅन्ट असे आहे. तरी या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कामोठे पोलीस ठाणे किंवा सहाय्यक पोलीस निरिक्षक एम. डी. भोसले यांच्याशी संपर्क साधावा. 




थोडे नवीन जरा जुने