विविध सामाजिक बांधिलकी उपक्रमाद्वारे खासदार श्रीरंग बारणे यांचा वाढदिवस झाला संपन्न
पनवेल दि.१६ (संजय कदम) : मावळ लोकसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेनेचे लोकप्रिय खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्फत आज विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवून वाढदिवस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपन्न केला. त्या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेनेच्या कळंबोली सेक्टर 3ई शॉप नं.1, ब्लॅकम्निवी मुंबई प्लॉट नंबर 18 येथील मध्यवर्ती कार्यालय येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी केले होते त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यात सहभाग घेतला व मोफत नेत्र चिकित्सा करून घेतली त्याचप्रमाणे आवश्यक त्या व्यक्तींना मोफत चष्म्याचे वाटप सुद्धा करण्यात आले. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविण्यात आले होते. 


कोट - महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार आज सर्वत्र खा. श्रीरंग बारणे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. नागरिकांनाच सुद्धा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद व सहकार्य मिळत आहे. - रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे


 
थोडे नवीन जरा जुने