शरीर तंदुरुस्त असणे गरजेचे ,आयुष्यात खेळाचे महत्व अधिक आहे : परेशशेठ ठाकूर






पनवेल /प्रतिनिधी
आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर तंदुरुस्त असणे गरजेचे आहे शारीरिक व्यायामाचे महत्व अधिक आहे आणि म्हणूनच आपण मैदानी खेळ खेळून शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे आयुष्यात खेळाचे महत्व अधिक असल्याचे प्रतिपादन पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेशशेठ ठाकूर यांनी केले .जागृती फॉउंडेशन आणि श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट आयोजित पनवेल युवा चषक २०२३ च्या क्रिकेट सामान्यांच्या च्या वेळी ते बोलत होते .


आजकाल जीवन खूप धकाधकीचे झाले आहे आपण नियमित व्यायाम केला पायजे आपले शरीर हीच आपली संपत्ती असून मैदानी खेळ प्रत्येकाने खेळले पाहिजे आज या ठिकाणी डॉक्टर ,सनदी लेखापाल (C .A ) ,व्यापारी असोसिएशन .पोस्ट ऑफिस टीम ,पनवेल मधील पत्रकार ,वकील ,शासकीय कर्मचारी क्रिकेट संघ ,अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी जागृती फॉउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे व श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट यांनी पनवेल युवा चषक आयोजित केला आहे अतिशय सुंदर असे सामने या ठिकाणी पाहायला मिळत असून ज्या टीम आज खेळात आहेत त्यांचे जीवन खूपच व्यस्त असते अशा क्षेत्रातील मान्यवरांसाठी निलेश सोनावणे यांनी जे सामने भारावले आहेत ते अतिशय सुंदर नियोजन केले असल्याचे सभागृह नेते परेश शेठ ठाकूर यांनी या वेळी आपल्या मनोगतात व्यक्त केले .


पनवेल तालुक्यातील डॉक्टर ,सनदी लेखापाल (C .A ) ,व्यापारी असोसिएशन .पोस्ट ऑफिस टीम ,पनवेल मधील पत्रकार ,वकील ,शासकीय कर्मचारी यांच्या करिता हे क्रिकेट चे सामने भरवण्यात आले होते यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रुपये अकरा हजार व चषक व्यापारी संघाचे कॅप्टन मनोहर सचदेव यांच्या व्यापारी संघाने पटकावला ,तर द्वितीय पारितोषिक रुपये सात हजार व चषक सनदी लेखापाल जयवंत तांडेल कॅप्टन असलेल्या पनवेल सनदी लेखापाल (C .A ) यांनी तर तृतीय पारितोषिक रुपये पाच हजार व चषक नामवंत वकील विशाल डोंगरे यांच्या वकिलांच्या टीम ने पटकावला . पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे खेडाळुनी हि सामन्यात रंगात आणली या सामन्यांदरम्यान उत्कृष्ठ फलंदाज ,उत्कृष्ठ गोलंदाज ,मॅन ऑफ द सिरीज ने खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चषक देण्यात आले .


अतिशय उत्साहात या क्रिकेट सामने पार पडले गेले असून या सामन्यांना बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे ,उद्योजक इकबालशेठ काजी,पनवेल महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे,पनवेल महानगर पालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील ,पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील ,भाजप युवा मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे ,यांच्यासह पत्रकार संजय कदम ,रवींद्र गायकवाड , माझं पनवेल चे संपादक विशाल सावंत, अनिल कुरघोडे, मयूर तांबडे ,गौरव जहागीरदार ,विशाल सावंत , शंकर वायदंडे ,मंदार दोंदे ,असीम शेख ,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते . 

   
जागृती फॉउंडेशन आणि श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट आयोजित पनवेल युवा चषक २०२३ च्या सामन्या करिता जागृती फॉउंडेशन चे अध्यक्ष तथा पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे , श्री प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट ऍड अध्यक्ष मनोहर सचदेव,जागृती फॉउंडेशन चे कल्पेश कांबळे ,संदेश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली . 



थोडे नवीन जरा जुने