उरणमध्ये महाआरोग्य शिबीराचे आयोजन.

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार दि. 25/2/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा चिर्ले, ता: उरण जि: रायगड येथे सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत शिवसेनेचे (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षाचे उरण शहर वैदयकीय कक्ष प्रमुख चैतन्य पाटील यांनी भव्य दिव्य असे महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरामध्ये नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, मोफत औषधे, इ.सी.जी, विविध आजार, एन्जीओग्राफी, एन्जिओप्लास्टी, तसेच मूळव्याध, हर्निया या अशा विविध आजारांच्या तपासण्याचा समावेश असणार आहे. मुंबई व नवी मुंबई परिसरातील अपोलो हॉस्पीटल, मेडिकोवर, फिनिक्स, डॉ.डी .वाय. पाटील हॉस्पीटल, सुश्रूषा हॉस्पीटल असे अनेक नामवंत हॉस्पीटलचा समावेश आहे


. या शिबीराचे उदघाटन मुख्यमंत्री वैदयकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अनेक मंत्री व इतर प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उरण शहर कक्ष प्रमुख चैतन्य पाटील यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने