उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील बोकडविरा येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान बोकडविरा-उरणच्या माध्यमातून शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 9:30 ते 10:00 या वेळेत शिवपूजन व दिप प्रज्वलन, 10 ते 11 वा. ढोल ताशा पथकाचे वादन, 11:00 ते 1:00 बाईक रॅली अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान बोकडविरा उरणचे पदाधिकारी सदस्य बोकडविराचे ग्रामस्थ, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे पहिल्यांदाच शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले गेले.या सोहळ्याला जनतेचाही उत्तम प्रतिसाद लाभला.
Tags
उरण