शिवजयंती उत्सव तसेच मराठी भाषा प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालया साजरा

पनवेल दि.१५ (वार्ताहर) : १९ फेब्रुवारी शिवजयंती उत्सव आणि २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे.


महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या जयंती निमित्त तसेच २७ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या मराठी भाषा दिनानिमित्त प्रत्येक शाळेत व महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत तसेच महाराष्ट्र सरकारमार्फत नव्याने घोषित झालेल्या "जय जय महाराष्ट्र माझा "या राज्य गीताची धून या दोन्ही दिवशी तसेच दररोज वाजवली जावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रायगड जिल्हा अध्यक्ष अनिमेष ओझे, जिल्हा सचिव ऍड. अक्षय जोशी, पनवेल तालुका अध्यक्ष सागर गायकवाड, तालुका सचिव आकाश गाडे, पनवेल महानगर सचिव अमर पाटील, प्रथमेश देवनाळे तसेच अन्य पदाधिकारी व महाराष्ट्रसैनिक यांनी शिक्षणाधिकारी पनवेल यांना निवेदन दिले आहे. या विद्यांची दाखल घेऊन पनवेलचे शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळामधील मुख्याध्यापकांना सदर विषयासंदर्भात सूचना दिल्या आहेत.थोडे नवीन जरा जुने