पनवेल दि.१५ (संजय कदम) : वॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी हिरो मोटोकॉर्पकडून हाय-टेक ११० सीसी स्कूटर (xoom) लाँच करण्यात आली आहे. हि स्कुटी पनवेल येथील एच.एम. मोटर्स येथे दाखल झाली असून या स्कुटरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे यांच्या हस्ते लाँचिंग झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे यांच्यासह एच.एम. मोटर्सचे मालक मनोज सूचक, सुनील सूचक, कंपनीचे सी ई ओ हर्षल सूचक, सिद्धार्थ सूचक, जिनल सूचक, हिरो कंपनी तर्फे प्रणय मोरे यांच्यासह पत्रकार आणि व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये डिप्युटी आरटीओ गजानन ठोंबरे यांनी नवीन गाडी प्रदर्शित केली व नवीन गाडीबद्दल हर्षल सूचक यांनी माहिती दिली.
स्कूटर श्रेणीला पुनर्परिभाषित करत आणि स्कूटर विभागातील आपल्या तंत्रज्ञान सक्षम प्रवासाच्या पुढील टप्याचा शुभारंभ करत हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्स व स्कूटरच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने आज नवीन ११० सीसी स्कूटर– झूम पनवेलमध्ये लाँच केली आहे. दैनंदिन प्रवासात साहस व उत्साह शोधणाऱ्या ग्राहकांच्या पिढीला आकर्षित करण्यासाठी बारकाईने डिझाइन आणि विकसित केलेली झूम स्कूटर समकालीन डिझाइन, उत्कृष्ट मॅन्युव्हरेबिलिटी, अतुलनीय गतीशीलता आणि असाधारण कार्यक्षमता देते. हिरो झुम मध्ये ११० सीसी श्रेणीमधील नवीन वैशिष्ट्यांचा समावेश आहे. इंडस्ट्री-फर्स्ट वैशिष्ट्य – हिरो इंटलिजण्ट कॉर्नरिंग लाइट (एचआयसीएल) आणि सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्ये-अधिक मोठे व अधिक रूंद टायर्स, ११० सीसी विभागातील गतीशील अॅक्सेलरेशन यासह ही स्कूटर मालकांना अद्वितीय गतीशीलता अनुभवाची खात्री देते. हिरो इंटेलिजण्ट कॉर्नरिंग लाइट TM (एचआयसीएल) हिरो झूमसह ११० सीसी विभागात पदार्पण करत आहे, ज्यामधून ग्राहकांना सुधारित सुरक्षितता मिळेल. एचआयसीएल राइडर वळण घेत असताना किंवा वक्राकार रस्त्यांकडे राइड करत असताना रस्त्यावरील अंधारमय कोपऱ्यांवर अव्दितीय प्रखर, सुस्पष्ट प्रकाश देते. राइडर्सना रस्त्यावरील कोपरे सुस्पष्टपणे दिसल्यामुळे फायदा मिळतो, ज्यामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षित राइडिंगची खात्री मिळते.
झुम मध्ये शक्तिशाली बीएस-६ प्रमाणित इंजिन आहे, ज्यामध्ये हिरो मोटोकॉर्पचे क्रांतिकारी आय३एस तंत्रज्ञान (इंडल स्टॉप–स्टार्ट सिस्टिम) आहे. नवीन डिजिटल स्पीडोमीटरसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि साइड- स्टॅन्ड इंजिन-कट-ऑफ स्कुटरच्या टेक प्रोफाइल मध्ये अधिक भर करतात. या नवीन गाडीच्या सर्विस संदर्भात सुनील सूचक यांनी पत्रकारांना माहिती दिली.
Tags
पनवेल