महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस ४८ तासाच्या आत गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने केली अटक




पनवेल दि.१५ (संजय कदम) : कोपरखैरणे येथील खाडीलगतच्या झाडाझुडपामध्ये सापडलेल्या अनोळखी महिलेची हत्येचा छडा लावण्यात गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला यश आले आहे. या हत्येतील आरोपीला ४८ तासाच्या आत गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. 

 
नवी मुंबई कोपरखैरणे येथील कांचनगंगा सोसायटीच्या विरुद्ध बाजूस असलेल्या नाल्यालगत खाडीकडे जाणान्या असंद रोडच्या डाव्याबाजुच्या झाडाझुडपामध्ये ३५ ते ४० वर्ष वयाच्या अनोळखी महिलेची अज्ञात व्यक्तीने तिचा गळा आवळून खुन केला तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह खाडीमध्ये टाकून दिला. या गुन्ह्याचा तपास मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वनाथ कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रताप देसाई, पो. हवा आतिश कदम, पो. हवा. सतिश सरफरे, पो. हवा महेश पाटील, पी. हवा. अनिल यादव आदींच्या पथकाने करत असताना चौकशी दरम्यान त्यांना सदर महिला हि सफाई कामगार असून तिचे नाव सायरा बानु हासमी आहे व ती मानखुर्द येथे वास्तव्यास असल्याचे माहित पडले. 


तांत्रिक तपास व गुप्त माहितीदारामार्फत पोलिसांनी राजकुमार पाल (वय ४० वर्ष, धंदा वॉचमन) ह्याला शिताफिने ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने सायरा हिने लग्नाचा तगादा लावल्याने तिला कोपरखैरणे येथील कांचनगंगा सोसायटीच्या समोरील नाल्यालगत, खाडीकडे जाणा-या अरुंद रोडच्या डाव्या बाजूला, झाडाझुडपामध्ये बोलावून ठार मारल्याचे कबुल केले. कोणताही पुरावा नसताना गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने फक्त तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने फक्त ४८ तासात गुंता सोडवला आहे.  



थोडे नवीन जरा जुने