पाताळगंगा : १३ फेब्रुवारी, सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपेने संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन झोन खरसई सावरोली, मार्केवाडी, तिवरे यांच्या वतीने खोपोली येथील संत निरंकारी सत्संग भवन वासंरग खोपोली या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रक्तदान शिबिरामध्ये रक्तसंकलन शासकीय रक्तपेढी आलिबाग-रायगड यांच्यामार्फत सहभाग दर्शविण्यात आला. शंभर च्या आसपास रक्त दात्यानी रक्त दान केले संत निरंकारी मंडळामध्ये रक्तदान शिबिराची ही शृंखला २३ ऑक्टोबर १९८६ पासून सुरू झाली असून दरवर्षी २४ एप्रिल मानव एकता दिवस या दिवसापासून संपूर्ण विश्वात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते, याच अनुषंगाने खोपोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, माजी नगरसेवक मंगेश दलवी, माजी नगरसेवक मोहन औसरमल, सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे, रायगड प्रेस क्लब कार्याध्यक्ष प्रशांत गोपाले निरंकारी मिशनचे संयोजक कुलबहादुर कुंवर, सावरोली ब्रांच मुखी राजेश बैलमारे, कर्जत ब्रांच मुखी शांताराम लदगे, सेवादल अधिकारी महेश भिलारे, सागर गुजरे, प्रकाश मार्के, करूणा, धारणे,सविता पवार, आदि सेवादल वर्ग निरंकारी मिशनचे अनुयायी उपस्थित होते
Tags
पाताळगंगा