पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) : शडरमध्ये मशीन चालविण्याचे काम करीत असताना मशीनचे चैन लावायला एक इसम गेला असता त्याच्या अंगावर मशीन कोसळून त्यात तो गंभीररित्या जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे .
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या लहास इको प्रा.ली. कंपनीमध्ये शडरमध्ये मशीन चालविण्याचे काम करीत असताना सुधीरकुमार सिंग ( वय ३२ ) हा मशीनची चैन लावायला गेला असता त्याच्या अंगावर मशीन कोसळून त्यात तो गंभीररित्या जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला आहे . या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Tags
पनवेल