संत श्रेष्ठ रोहिदास महाराज यांच्या 664 व्या जयंतीनिमित्त गटई कामगारांचा मेळावा उत्साहात संपन्न



पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) :  पनवेल शहर गटई कामगार युनियन संत श्रेष्ठ रोहिदास महाराज यांच्या 664 व्या जयंतीनिमित्त संत रोहिदास महाराज जयंती व उलवे रोड येथील गटई कामगारांचा मेळावा उत्साहात पार पडला. 


                    पनवेल मधील उद्योजक आणि स्थानिक राजकीय नेते रवीशेठ पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गटई कामगार युनियन चे अध्यक्ष माजी नगरसेवक रायगड भूषण डॉ. शिवदास कांबळे च्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी उलवे नोट चे अध्यक्ष शंकर परदेशी व सरचिटणीस दत्ता कदम यांनी परिश्रम घेतले उलवे नोड मधील सर्व घटक कामगारांना सिडकोच्या माध्यमातून  लायसन परवाना देण्यात साठी सर्वात प्रयत्न सुरू असून लवकरच सर्व ते कामगार लायसनधारक असतील अशी ग्वाही अध्यक्ष शिवदास कांबळे यांनी दिली आहे . 


तर बसून व्यवसाय करणारा प्रत्येक स्टॉल धारक हा त्याचा मालक असेल इतर कोणीही गैरपद्धतीने अशा प्रत्येक कामगारांचा फायदा घेत असेल तर त्यावरती गंभीरपणाने कारवाई करण्यात येईल असे देखील या सभेमध्ये ठरवण्यात आले.  पनवेल महानगरपालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गटई कामगारांसाठी  आयुक्त गणेश देशमुख  यांनी स्टॉल परवाना देण्याची योजना राबविण्यात येईल असे शिवदास कांबळे यांना त्यांच्या भेटीमध्ये आश्वासित केली आहे.  महापालिका क्षेत्रांतर्गत तसेच सिडको अंतर्गत सर्व घटक कामगारांना त्यांच्या व्यवसायासाठी युनियन खंबीरपणाने पाठिंबा देत असून त्यांचे संरक्षण आणि प्रतिष्ठान ही मुख्य कामे युनियनचे असून त्यांच्या माध्यमातून लवकरच सगळ्यांना लायसन देण्याचं काम पूर्ण करण्यात येईल असे एकमताने या मेळाव्यामध्ये ठरवण्यात आलेआहे. हा मेळावा अतिशय उत्साहामध्ये पार पडला. 




थोडे नवीन जरा जुने