कळंबोली येथे LGBTQ समुदायासाठी फॅशन शो

पनवेल दि. ११ (वार्ताहर) : नवप्रवाह फाऊंडेशन आणि कै.रघुनाथ आंबेरकर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राजे शिवाजी नगर रहिवासी मंडळ कळंबोली च्या प्रांगणात LGBTQ समुदायासाठी फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. एकूण ०८ स्पर्धकांनी या फॅशन शो मध्ये सहभाग घेतला. ह्या शो मध्ये अमित गावंड हा विजेता ठरला असून विवेक जाधव आणि अझर पालेकर उपविजेतेपद ठरले आहेत. 


LGBTQ समुदायासाठी एक मंच मिळावा, त्यांच्या समस्या, अडचणी समाजापर्यंत पोहोचाव्या या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या फॅशन शो साठी नवप्रवाह फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. अरुणा सावंत, प्रिती सावंत, मिना राय, सुजाता बत्तीन, विघ्नहर्ता ऑइल अँड केमिकल चे बाळासाहेब हांडे, रमेश राव, ऋतिक महाडकर, अनिकेत कुवेसकर यांचे सहाय्य लाभले. तर या फॅशन शो चे परिक्षण माॅडेल राणी जैसवाल, उमेरा शेख, पवन गावंड यांनी केले. संपूर्ण शो ची कुरियोग्राफी लावणी सम्राट, पॅथालाॅजिस्ट ज्ञानेश्वर बनगर यांनी केली. तसेच कार्यक्रमाचे व्यवस्थापन संस्थेच्या अध्यक्षा माधुरी आंबेरकर, संस्थेचे खजिनदार अमोल आंबेरकर व सचिव अमित कुलकर्णी यांनी केले. नवप्रवाह फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, वस्तीतील मुलांना शिक्षण, जेष्ठ नागरिक संघ,आरोग्य अशा विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.
फोटो : कळंबोली येथे LGBTQ समुदायासाठी फॅशन शो


थोडे नवीन जरा जुने