28 वर्षे इसम बेपत्ता

पनवेल दि २६(वार्ताहर) :पनवेल तालुक्यातील 28 वर्षीय अरुण व्ही हा इम्यानुवेल आश्रम, खैरवाडी (मोरबे) येथील आश्रमाच्या भिंतीवरून उडी मारून कोणाला काही न सांगता कुठेतरी निघून गेला. त्यामुळे तो हरवला असल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे


.
         त्याचा रंग सावळा, उंची पाच फूट, तीन इंच, चेहरा उभट आहे. तो अंगाने सडपातळ असून कपाळावर डाव्या बाजूला जुन्या माराची निशाणी आहे. त्याने अंगात काळ्या रंगाचा हाफ बाह्यांचा टी शर्ट व सफेद रंगाचे फुल पॅन्ट घातली आहे. पायात पॅरागॉन कंपनीची स्लीपर असून तो थोडा वेडसर आहे. त्याला मल्याळम, इंग्रजी भाषा बोलता येते व समजते. या इसमाबाबत अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधावा.थोडे नवीन जरा जुने