पनवेल बाजार समितीची 30 एप्रिल रोजी निवडणूक; त्याच दिवशी होणार मतमोजणी









*पनवेल बाजार समितीची 30 एप्रिल रोजी निवडणूक; त्याच दिवशी होणार मतमोजणी*
पनवेल दि.३१ (वार्ताहर) : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून त्या दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. एकूण १८ जागांसाठी बाजार समितीची निवडणूक होणार आहे.



                 मुंबईचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पनवेल उरण तालुक्याबरोबरच घाटमाथ्यावरील शेतकरी आपले शेती उत्पादन घेऊन पनवेलच्या बाजारात येतात. कांद्याबरोबरच भाजीपाला विक्रीसाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या बाजार समितीवर सातत्याने शेतकरी कामगार पक्षाची सत्ता राहिलेली आहे. लालबावट्याने कायम या ठिकाणी प्राबल्य निर्माण केले आहे. विरोधकांना बाजार समितीमध्ये कधीही जम शेकापने बसू दिला नाही.



 परंतु मध्यंतरी वेगवेगळ्या कारणांमुळे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती गाजली. बेकायदेशीर गाळ्यांचे बांधकाम करून त्याची विक्री करण्यात आली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी विधानसभेत आवाज उठवला. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात आली तसेच चौकशीचा फेरा लावण्यात आला. दरम्यान या बाजार समितीच्या सार्वजनिक निवडणुकीची बिगुल वाजले आहे. २७ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत नामनिर्देशक पत्र भरता येणार आहेत. ५ एप्रिल रोजी आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही 20 एप्रिल पर्यंत असणार आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या दरम्यान मतदान घेतले जाणार आहे




*
थोडे नवीन जरा जुने