दोन मुलांसह महिला बेपत्ता








पनवेल दि.३१ (वार्ताहर) : तालुक्यातील पारगाव येथून आपल्या दोन मुलांना सोबत घेवुन कोणास काही एक न सांगता राहते घरातुन महिला कोठेतरी निघुन गेल्याने महिलेसह मुलांच्या हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.




                   कल्पना रामगिरी गिरी असे या महिलेचे नाव असून ती आपल्या तुषार गिरी आणि चेतन गिरी या दोन मुलांसह कोठेतरी निघून गेली आहे. कल्पनाचे वय २५ वर्षे असून अंग मध्यम, रंग-गोरा, नाक सरळ, केस काळे, डोळयावरती चष्मा, गळयात सोन्याचे मनी मंगळसुत्र तर अंगात निळया रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला आहे. तर मोठा मुलगा तुषारचे वय ६ वर्षे असून त्याचा रंग गोरा, नाक सरळ असून अंगात निळया रंगाची जिन्स पॅन्ट व काळया रंगाचा शर्ट घातलेला आहे



 त्याचप्रमाणे लहान मुलगा चेतन चे वय ३ वर्षे असून तो रंगाने गोरा, नाक सरळ असून त्याने निळया रंगा ची जिन्स पॅन्ट व लाल रंगाचा टि शर्ट घातलेला आहे. या महिलेसह मुलांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.०२२-२७४५२३३३ किंवा पोहवा संदीप नवले यांच्याशी संपर्क साधावा.



थोडे नवीन जरा जुने