कामोठे दि.३१ मार्च (4Kन्युज) विश्व हिंदू परिषद बजरंग दल,कामोठे आयोजित श्री रामजन्मोत्सव सोहळा
गुरुवार ३०/३/२०२३ (रामनवमी) कामोठे येथील संत तुकाराम मंदिरात साजरा करण्यात आला या सोहळ्यात कमोथमहील अनेक भाविक उपस्थित होते
या सोहळ्यात श्री श्री १००८ महामंडलेश्वर अंबादासानंद सरस्वती अहिल्यानगर (नगर) यांचे सुश्राव्य किर्तन झाले नंतर दुपारी १२:०० वा. प्रभु श्री रामांचा पाळणा म्हणत राम जनमोस्त्व साजरा केला
सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ३६०० कि. मी. ची नर्मदा परिक्रमा पुर्ण केल्याबद्दल ह.भ.प. रामदास महाराज गोर्डे व ह.भ.प.शांताबाई गोर्डे यांचा आमदार प्रश्नात ठाकूर आणि मा. भाजपा कामोठे शहर अध्यक्ष व रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक श्री. रवींद्र जोशी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला तुडुंब गर्दी झाली होती.
Tags
पनवेल