दुर्मिळ अशा जीवघेण्या आजाराने पिडीत एक वर्षाच्या बाळावर यशस्वी उपचार; नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे यशस्वी प्रयत्न







दुर्मिळ अशा जीवघेण्या आजाराने पिडीत एक वर्षाच्या बाळावर यशस्वी उपचार; नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे यशस्वी प्रयत्न
पनवेल दि. ३० (वार्ताहर): खोकला, सर्दी आणि ताप यासारख्या तक्रारींबरोबरच सेप्सिस, रेय सिंड्रोम (एक दुर्मिळ परंतु गंभीर स्थिती ज्यामध्ये गोंधळ उडणे, मेंदूची सूज आणि यकृताचे नुकसान होते) सारख्या आजारामुळे, डिहायड्रेशन आणि जुलाब होणाऱ्या १ वर्षाच्या बाळावर यशस्वी उपचार करण्यात आले. डॉ. नरजोन मेश्राम, पेडियाट्रिक आयसीयूचे प्रमुख, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई आणि त्यांच्या टीमने प्रसंगावधान राखत या बाळाला नव्या आयुष्याची भेट दिली.



     खारघर येथील रहिवासी असलेल्या आरव सिन्हा (नाव बदलले आहे)* याला दोन दिवसांपासून खोकला, सर्दी, ताप आणि जुलाब होत असल्याने घाबरुन गेले होते. त्यांनी स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेतला. ज्यांनी त्याला औषध दिले परंतु त्याची प्रकृती सुधारली नाही. तथापि, त्यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली आणि त्यांना तात्काळ मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले जेथे बाळावर त्वरीत उपचार करण्यात आले. डॉ. नरजोन मेश्राम, पेडियाट्रिक आयसीयूचे प्रमुख, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई सांगतात की, आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात दाखल झालेल्या या बाळाची श्वसनक्रिया बंद पडणे, डिहायड्रेशन आणि बुब्बुळ वर फिरणे आणि तीव्र श्वासोच्छवासाचा त्रास होता. त्याच्या शरीरात चयापचयाशी संबंधीत असलेले ऍसिडोसिस नावाच्या अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त होते आणि त्याच्या हृदयाचे ठोके 230/प्रति मिनिट इतके कमी होते. बाळाला आपत्कालीन स्थितीत दाखल करुन त्याच्यावर औषधोपचार सुरु करण्यात आले. डॉ संदीप सावंत, बालरोगशास्त्र विभाग प्रमुख, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई पुढे सांगतात की बाळाची ऑक्सिजन पातळी आणि श्वासोच्छवासाची क्षमता सुधारण्यासाठी त्याला नाकावाटे कॅन्युला घातली गेली. 24 तासां



हून अधिक काळ उपशामक औषध घेतल्यानंतरही बाळ सतत बेशुध्दावस्थेत जात होते. त्याला पुन्हा इंट्युबेट करण्यात आले.त्यानंतर मुलाला वरच्या आणि खालच्या अंगाच्या अनैच्छिक हालचाली सुरू झाल्या. सीटी स्कॅन केल्यावर, ते सामान्य होते परंतु पोटाच्या अल्ट्रासाऊंडमध्ये सुजलेल्या आणि वाढलेल्या पित्ताशयासह फॅटी लिव्हरचे निदान झाले. त्याला दुय्यम माइटोकॉन्ड्रियल हेपॅटोपॅथी म्हणजेच रेय (एक दुर्मिळ परंतु गंभीर स्थिती ज्यामध्ये गोंधळ उडणे, मेंदूची सूज आणि यकृताचे नुकसान होते) सारख्या आजाराचाही संशय होता. हळूहळू, बाळाच्या अनेक अनैच्छिक हालचाली सुरू झाल्या. त्याचा ईईजी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दाखवत होता. परंतु एमआरआयमध्ये तीव्र ल्युकोएन्सेफॅलोपॅथीचे निदान झाले. हे सहसा जेसी व्हायरसमुळे होते. हा एक तीव्र आजार आहे जो रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम करते. सात दिवसानंतर पुन्हा मुलाला पुन्हा बाहेर काढण्यात आले आणि कॅन्युला घालण्यात आला आणि अनैच्छिक हालचाली कमी करण्यासाठी औषधोपचार सुरू केले. मुल स्तनपानाचा स्विकार करत नव्हते. नंतर, बाळाला 5 फेब्रुवारी रोजी सतत येणाऱ्या तापासाठी टीबायोटिक्स देण्यात आले.



 एका आठवड्यानंतर त्याची प्रकृतीत सुधारणा दिसून आली आणि ईईजी निरीक्षण करण्यात आल्याची माहिती डॉ स्वप्नील पाटील, बालरोग तज्ज्ञ मेडीकव्हर हॉस्पीटल, नवी मुंबई यांनी स्पष्ट केले. डॉ मेश्राम पुढे सांगतात की, मुलाला आहार देण्यास सुरुवात झाली आणि अनैच्छिक हालचाली देखील कमी झाल्या. या बाळाची प्रकृती आता स्थिर आहे आणि महिनाभर रुग्णालयात राहिल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. त्याच्यावर योग्य वेळी उपचार न केल्यास त्याला जीव गमवावा लागला असता.आमच्या मुलाला होणाऱ्या वेदना पाहून आम्ही घाबरलो. ताप कमी न झाल्याने तसेच श्वसनासंबंधी येणाऱ्या अडचणींमुळे आम्ही घाबरलो होते. त्याला बर्‍याच आरोग्य समस्या आहेत ज्यांची आम्हाला यापुर्वी माहिती नव्हती. मी मेडीकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे आभार मानतो. आमचे मूल घरी परतले आहे आणि त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे अशी प्रतिक्रिया बाळाचे पालक कुशल सिन्हा (नाव बदलले आहे) यांनी व्यक्त केली.


थोडे नवीन जरा जुने