रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर शिवमंदिराचा सुशोभीकरणाच्या शुभारंभरामनवमीच्या शुभ मुहूर्तावर शिवमंदिराचा सुशोभीकरणाच्या शुभारंभ
पनवेल दि. ३० ( वार्ताहर ) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या १७ लाख रूपयाच्या निधीतून शिव मंदिराच्या सुशोभीकरणाच्या शुभारंभ आज रामनवमीचे औचित्यसाधू करण्यात आला.


     रामनवमीच्या शुभमुहूर्तावर तळोजा मजकूर येथील शिवमंदिराचा सुशोभीकरणाच्या कामाचा उद्घाटन करण्यात आले. या शुभीकरणाचा निधी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात आलेल्या निधी पैकी १७ लाख शुभीकरणासाठी देण्यात आला आहे. या निधीसाठी, शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, पनवेल महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे,बाळा मुंबईकर यांनी प्रयत्न केले होते. त्यानुसार आज गावचे जेष्ठ नेते सखाराम शेठ पाटील, शंकरशेठ पाटील, कांता पाटील, बाळ मुंबईकर, कैवारी पाटील, सुनिल मोरे आदींच्या यांच्या उपस्थितीत करण्यात आले.थोडे नवीन जरा जुने